क्षितीज
क्षितीज


जायचे तिथे आज ना उद्या
क्षितीज ते दिसे नयना
उभी तेथे का आसवे सदा
का हरवती चेतना....
रातंदिवसा, एकांत हा,
स्वप्न ते दिसे लोचना-
दव हे पडे, पाकळ्यांवरी
ते तिथे का थिजेना?
भावबंध हे बांधले जिथे
का तिथे ते तुटेना?
साद कोणाची, अग्यम्यातुनी
काहूरले मन, समजेना!
एक तारा, खुणावतो नभी
झेप घेती आशा गगना-
रव हा मनाचा, शांत झाला!
लयास गेल्या भावना!