सावली
सावली


रुक्ष उन्हात धीर देते,
दाट वृक्षाची छाया,
संकटात ती साथ देते,
सावलीसम भार्येची माया!
मूला झळ पोहोचू न देई,
ममतेचा आई पदर धरी,
पिता खंबीर आधार तो,
उभा छत्र धरून करी!
सायंकाळी देती चकवा
पडछाया उंच दिसते,
रात्री मात्र लोप पावे,
कुठे अंधारात विरते?
मानवाची सावली अशी
बदलते वेळेसवे आकार,
व्याख्या तिची जाणावी,
जसे रूप होई साकार!