आळवणी न्यायची..
आळवणी न्यायची..


आळवणी न्यायची
आता देवा दारी!
इथे आहेस तू तिथे ही
सर्वत्र असे तुझी सावली,
तरीही शोध घेतसे मन
कुठे आहे तू देवा?
माजतो कोलाहल आजही,
जगी आज सुखाचा बाजार?
कुठे तुझ्या दर्शना आतुर जन?
भरला इथे स्वात्मसुखाचा आगार!!!
सर्वत्र दाटलं धुकं अंधकाचे
भुकेली कुत्र्यांची जमात सारी,
तुझ्या संगे जनावरेही माणसात आली
मग माणसं का अशी स्वैरपिशाच्च झाली
कुठे तुझ्या अस्तित्वाची सावली
माझ्या नशिबी ना जाणवली!
कितीदा तरी घालत साद घातली,
तुज येइल जाग देवाकधी?
रानीवनी होते पण कधीही
दु:ख ना सल मनात राहीली,
या पाश्चिमात्य संस्कृतीनं
केलं माणसाला राक्षसी!
ओरडून थकले सगळे
झिजवले उंबरठे सारे,
न्यायला देवा तरीही,
तुझ्या काठीची सर नाही
दावी देवा मला तुझी
न्याय मूर्ती खरी
पूजीन अंतरी या,
होईल मग्न भक्तीत मीही!!!!