जयभीम
जयभीम
भिमाईच्या सुता, तुला रामजीचे वरदान।
चला गर्जना करुया, जयभीम-जयभीम।।धृ।।
लहानपणी भोगलास, मनुवादी यातना।
दीन दुबळ्यांच्या तू, जाणलास संवेदना।।
दिधलास दलितांसाठी, शिक्षणाने केलास काम।।।
चला गर्जना करूया, जयभीम-जयभीम।।१।।
बुद्ध-कबीर-फुले, यांना मानीलेस गुरू।
मानवतावादाचे, काम केले सुरु।।
देऊन तिलांजली, स्वीकारलेस बौद्ध धम्म।।।
चला गर्जना करूया, जयभीम-जयभीय।।२।।
विद्या-शिल-स्वाभिमान, तुझे रे दैवत।
या त्रिसूत्राने, तू घडलास अद्भूत।।
ना झुकलास कुणापुढे, राहिलास सदा सक्षम।।।
चला गर्जना करुया, जयभीम-जयभीम।।३।।
वर्णव्यवस्थेने नाकारले, शुद्रा देवदर्शन।
माणसाच्या छायाने, विटाळती भटांगण।।
तोडण्या जाती बंधन, खुले केले चवदार-काळाराम।।।
चला गर्जना करुया, जयभीम-जयभीम।।४।।
केले मुक्त बहुजना, करुन मनुस्मृतीचे दहन।
प्रजासत्ताक अर्पिले, लिहुन देशाचे संविधान।।
देशाच्या सन्मानासाठी, अनमोल केले कर्म।।।
चला गर्जना करूया, जयभीम-जयभीम।।५।।