STORYMIRROR

Gautam Jagtap

Abstract

3  

Gautam Jagtap

Abstract

निखारा

निखारा

1 min
62

आज पेटत्या सरणातला, निखारा व्हायचं मला...!

भाजायचं आहे अंध प्रथेला,आणि जुलमी आत्याचाराला

कारण अंध प्रथेन केलं अंध माणसाला

अज्ञानाच्या अंधारात कोंबलं आणि वेदनांच्या डोईत लोटलं या अंध प्रथेनं

अत्याचाराने जगण्यास असाह्य केलं हो

पिसाळलेल्या कुत्र्यांनी गरीबांच्या पोटाचा लचका तोडला...

म्हणून आज पेटत्या सरणातला निखारा व्हायचं मला...!


आज पेटत्या सरणातला, निखारा व्हायचं मला...!

भाजायचं आहे... बलत्काराला आणि भ्रष्टचाराला

कारण बलत्काराने कित्येक आय्या,बहिणी शोषीत होऊन मरले

सरले नाही हो हे बलत्कारी, म्हणून यांना लालबुंद निखाऱ्यात भाजल्या शिवाय पर्याय नाही

भ्रष्टचारीनो माझ्या देशाचा सन्मान विकायला निघणारे

एकदाचं भाजणार तुमच्या कुटनितीला,पेटवणार त्या काळ्याबाजाराला...

म्हणून आज पेटत्या सरणातला निखारा व्हायचं मला...!



आज पेटत्या सरणातला निखारा व्हायचं मला

भाजायचं आहे देशद्रोहीला आणि वाद विवादाला

कारण देशद्रोहीने बेत रचला,संपवावा देश आपला

कसला हा कुविचार त्यांचा, ठेचून भाजावा त्याला

वादविवाद हा कुठवर पोहचला, मानसा-मानसाच्या जीवावर चितला

भरडला पाहिजे जात्याने, करावा एकदाच वार, पुन्हा कधीच ना यावे कुणा वाट्याला...

म्हणून आज पेटत्या सरणातला निखारा व्हायचं मला...   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract