हरवलाय झोका
हरवलाय झोका
माणसांच्या गर्दीत हरवला आहे झोका
तयाच्या स्मृतीनंही चुके काळजाचा ठोका
जिव्हाळ्याच्या झाडाला झोका होता बांधलेला
माणूसकीच्या धाग्याचा दोर होता सांधलेला
विश्वासाचा दोर आता गळफासाचा झालाय
स्त्री अत्याचाराचा प्रश्न एेरणीवर आलाय
भ्रष्ट विचारांचा झोका उंच आभाळी चालला
माणसांएेवजी आता पैसाच बोलू लागला
प्रदूषणाचा विळखा निसर्गाचे हेलकावे
पशू पक्षी प्राण्यांनी सांगा कुठे झुलावे?