STORYMIRROR

Madhuri Bagde Alai

Others

1.0  

Madhuri Bagde Alai

Others

कुंकू

कुंकू

1 min
26.7K




लाल कुंकवाच बोट

तिच्या कपाळी कोंदण

बाई प्रेमाने कोरते

उभ्या जन्माचं बंधन


कुंकू प्रेमाचं प्रतीक

जीव अडके तयात

बाई मनात जपते

साता जनमाचं नातं


कुंकू जीवना आधार

सुखी जीवनाचं सार

बाई हसून झेलते

संसाराचा सारा भार


लाल कुंकवात दडे

तिच्या आयुष्याचं गुज

बाई स्वप्नात रमते

उरी आशेचच बीज


कुंकू सौभाग्याच लेणं

जपे तिचं बाईपण

बाई आयुष्य गुंफते

कुंकू जीवन दर्पण


कुंकू शोभते कपाळी

जणू शुक्राची चांदणी

बाई एकच मागते

सुखी राहो तिचा धनी





Rate this content
Log in