क्षितिजापल्याड प्रेम
क्षितिजापल्याड प्रेम
क्षितिजापल्याड प्रेम
बेधुंद त्याला करतं
तिच्या आकर्षणानं
सागरा उधाण भरतं
क्षितिजापल्याड प्रेम
पान्हा फोडते आईला
तिच्या नुसत्या स्पर्शाने
वासरू लुचते आईला
क्षितिजापल्याड प्रेम
कवेत तिजला घेते
पावसाच्या प्रेम धारांनी
ती हिरवळ होऊन बहरते
क्षितिजापल्याड प्रेम
प्राण अर्पिते देशाला
तिच्या रक्षणासाठी
भाषा स्वार्थाची कशाला
क्षितिजापल्याड प्रेम
दोघांना धुंद करते
प्रेमाची निराळी कहाणी
जगाला आदर्श ठरते