प्राजक्त
प्राजक्त


दिस लागताना
तुझ्या कळीतुन
फुले प्रेमाचा हुंकार !
भर रात्री
तव यौवनाचा
सुगंध चोहीकडे !
पहाटेच्या क्षणी
तव गंधाने
मन जाई बहरून !
उठता क्षणी
मृदू स्पर्शाने
तन जाई शहारूनी !
असे हे मन
सोवळे-सोवळे
प्राजक्तापरी कोवळे-कोवळे !
दिस लागताना
तुझ्या कळीतुन
फुले प्रेमाचा हुंकार !
भर रात्री
तव यौवनाचा
सुगंध चोहीकडे !
पहाटेच्या क्षणी
तव गंधाने
मन जाई बहरून !
उठता क्षणी
मृदू स्पर्शाने
तन जाई शहारूनी !
असे हे मन
सोवळे-सोवळे
प्राजक्तापरी कोवळे-कोवळे !