STORYMIRROR

Nivedita Kenge

Abstract

3  

Nivedita Kenge

Abstract

सौंदर्य नव्या सृष्टीचे

सौंदर्य नव्या सृष्टीचे

1 min
135

नवा सोहळा सृष्टीचा

नव ऋतु आगमनाचा

नव सौख्य पालवीचा

हा गारवा हेमंताचा


प्रफुल्लित वृक्ष सारे

नव्या उमाळीचे वारे

लुब्ध कोवळी अंकुरे

होती क्षणांत हसरे


आसुसलेल्या सृष्टीस

मोहक मोती नजराणा

लाजऱ्या पहाटेस

नजरेचा बहाणा


नव आशामयी सृष्टी

ओढते निळे अस्तर

नव रंगाच्या साक्षीने

जन्मते नव अंकुर


नवदिन आरंभास

सोनकिरणांचे आगमन

आलिंगिती सृष्टीस

अनमोल हे क्षण!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract