Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasant Sanap

Abstract Others

3  

Vasant Sanap

Abstract Others

इटूबा

इटूबा

1 min
34

गावी आमच्या यायची एसटी दोन वेळी,

सकाळी जाणं तिचं येई सायंकाळी.

जाई आम्ही शिकण्या एसटीने शाळेला,

इटूबाबा असायचा आमच्या सोबतीला.---१

करायचा संतापाने घरच्यांना जाच,

यायचा एस्टी ने रोज शहरी उगाच.

नाद त्याला दारू अनं बिडी पिण्याचा,

एसटीचा प्रवास विना तिकीट करण्याचा.---२

वाहकाच भांडण तिकीटा पायी रोज,

करी पैसे टाळण्याचा बहाण्याची खोज.

आला कधी जर वाहक शिस्तीने कडक,

करी पायउतार त्याला मध्येच बेधडक,---३

चालू अस जगणं वर्षे दर वर्षे,

इटूबा्चा खोडीला सगळेच तरसे.

झाला मोठा एकदा एसटीला अपघात,

बसलेल्या इटू्चा झाला त्यातअंत----४

दिली जखमींना एसटीने भरपाई,

इटूचा घरच्यांना मिळाली पैं-पैं.

केला आयुष्यभर प्रवास विना तिकीट,

जातांना ही शेवटी लुटलं एसटीच पाकीट.----५

Rate this content
Log in

More marathi poem from Vasant Sanap