Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Vasant Sanap

Others

3  

Vasant Sanap

Others

इठुबा

इठुबा

1 min
12


गावी आमच्या यायची एसटी दोन वेळी,

सकाळी जाणं तिचं येई सायंकाळी.

जाई आम्ही शिकण्या एसटी ने शाळेला,

इठुबाबा असायचा आमच्या सोबतीला.

करायचा संतापाने घरच्यांना जाच,

यायचा एसटी ने रोज शहरी उगाच.

नाद त्याला दारू अनं बिडी पिण्याचा, 

एसटी चा प्रवास विना तिकीट करण्याचा.

वाहकाच भांडण तिकीटापायी रोज,

करी पैसे टाळण्याचा बहाण्याची खोज.

आला कधी जर वाहक शिस्तीने कडक,

करी पाय उतार त्याला मध्येच बेधडक.

चालू अस जगणं वर्षे दर वर्षे,

इठुबाच्या खोडीला सगळेच तरसे.

झाला मोठा एकदा एसटी ला अपघात,

बसलेल्या इठू्चा अंत होई त्यात.

दिली जखमींना एसटी ने भरपाई,

इठूचा घरच्यांना मिळाली पै-पै.

केला आयुष्यभर प्रवास विना तिकीट,

जातांना ही शेवटी लुटलं एसटी च पाकीट...


Rate this content
Log in

More marathi poem from Vasant Sanap