STORYMIRROR

Dr.Surendra Labhade

Abstract Others

4  

Dr.Surendra Labhade

Abstract Others

पाहिलयं

पाहिलयं

2 mins
427

डोळ्यांत पाणी असतांना, 

मी ओठांना हसतांना पाहिलयं, 

काळजाचा दाह होतांना, 

मी अंग पोळतांना पाहिलयं. 


काळजीचा स्पर्श करतांना, 

मी फुलांना सुकतांना पाहिलयं, 

विश्वासाच्या मुळ्या खोलवर असतांना, 

मी प्रेमाचे झाड कोसळतांना पाहिलयं. 


मुलांना मोठे करतांना, 

मी आईबापाला झुरतांना पाहिलयं, 

मायेच्या त्या उबदार वस्त्रांना, 

मी वृद्धाश्रमात विरतांना पाहिलयं. 


दान देणाऱ्या हातांना, 

मी चोरी करतांना पाहिलयं, 

आश्वासने देणाऱ्या चेहऱ्यांना, 

मी मिस्किलतेने हसतांना पाहिलयं. 


गर्दित असतांना हजारोंच्या, 

मी मनाला एकटे फिरतांना पाहिलयं, 

स्वताच्या सावलीवरती विश्वास असतांना, 

मी तिलाही अंधारात साथ सोडतांना पाहिलयं. 


खिशात पैसे असतांना, 

मी अनोळखींना जवळ येतांना पाहिलयं, 

खिसा खाली असतांना, 

मी जवळच्यांनाही दुर जातांना पाहिलयं.


माणसाला वेदना होतांना, 

मी लोकांना आनंदी पाहिलयं, 

मेल्यावर लटकेच सारे रडतांना, 

मी प्रेताला हसतांना पाहिलयं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract