STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

4  

Manisha Awekar

Abstract

माहेर सासर

माहेर सासर

1 min
369

झडझड आषाढाची

आता सये सरायची

रिमझिम सरी येती

धरेवरी     (१)


सर येता श्रावणाची

 सय दाटे माहेरची 

येता सांगावा मजसी

मन फुले  (२)


छोटी भावंडे दारात

वाट किती बघतात

ताई जवळ येताच

 गळामिठी    (३)


गाठी सा-यांच्या पडता

डोळे येती पाणावता

 गळा माऊली पडता

स्वर्गसुख     (४)


चार दिसांचे माहेर

पुन्हा भेटते सासर

वाट बघतो भर्तार

जीवेभावे  (५)


सासूबाई मायमूर्ती

सास-यांना लेक प्रीती

सर्वांची मी आवडती

सासुरात   (६)


घरी गोकुळ सजले

आली चिमणी पावले

स्वर्गसुख ओसंडले

संसारात    (७)


आहे मायेच्या छत्रात

पतीप्रेमा कोंदणात

बाळांच्या बाहुपाशात

सुखामधे  (८)


आता माहेर सासर

झाले प्रेमाचे आगर

नाही काही फेरफार

एकरुप   (९)



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract