STORYMIRROR

Akash Bansode

Abstract Inspirational Others

4  

Akash Bansode

Abstract Inspirational Others

गैरसमज नको

गैरसमज नको

2 mins
239


हो मी बोलतो तिच्यासोबत सारकाही,गप्पा मारताना वेळेचं भानही राहत नाही..

तिच्या केसां पासून पायाच्या नखांपर्यंत अगदी नखशिखांत जाणून घेतोय तिला हळूहळू..

हो लिंग,जात,समाज नावाची गोष्ट आमच्यात कधी आडवी येत नाही..

नाय गैरसमज होयला नको म्हणुन सांगतो ती मैत्रीण आहे माझी..


तिच्या रिप्लाय साठी मी जागत नाही,आणि हो चातकासारखी ती ही माझी वाट पाहत नाही..

हो पण चुकून जर कॉल रीसिव्ह नाही केला आणि समजा रिप्लाय ला उशीर झाला..

तर तुम्हाला सांगतो डीक्टो नवरा-बायको सारखे एकमेकांना भांडतो आम्ही..

कधी मी होतो हरामी तर कधी ती ही होते शरमेने लाल गुलाबी..

नाय गैरसमज होयला नको म्हणुन परत सांगतो ती मैत्रीण आहे माझी..


बोलण्यात खंड पडला की काहीतरी हरवल्या सारख वाटत,त्यामुळे मी ही शोधत नाही..

आणि तीही अवकाळी पावसासारखी कधीही बरसत नाही..

आजचा वर्तमान आणि उद्याच म्हातारपण कस जगायचंय हेही ठरवून ठेवलय आम्ही..

पुढच्या क्षणाचा भरोसा नाही, म्हणून तो कल्पनेतला श्वासही अनुभवलाय आम्ही..

नाय गैरसमज होयला नको म्हणुन तेच परत सांगतो ती मैत्रीण आहे माझी...


हो एकमेकांच्या जाणिवेवर,भावनांवर एवढंच काय तिच्या योनीवर,मासिकपाळीवर ही बिनधास्त बोलतो आम्ही..

एकमेकांचा हातात हात घेऊन एकमेकांना घट्ट मिठी ही मारतो आम्ही..

हो लोक म्हणतात वाया गेलेली,थर्डक्लास,लपडेबाज आहोत आम्ही..

त्यांच्या so called चौकटीत, नियमात किंवा संस्कृतीत बसत नाहीत हो आम्ही..

नाय गैरसमज होयला नको म्हणून तेच तेच सांगतो ती मैत्रीण आहे माझी..


हे सगळं करण्यासाठी मला प्रियसीची,लपड्याची गरज लागत नाही..

रडू वाटेल तेंव्हा एकमेकांनजवळ निर्मळ झऱ्यासारखं फुटतो आम्ही..

एकमेकांच्या विचारांना,जाणिवेला अगदी आईबाप होऊन जपतो आम्ही..

प्रत्येक दिवस नव्याने जगतो आणि आम्हाला बघायचंय तसच या जगाकडे बघतो आम्ही..

नाय गैरसमज होयला नको म्हणुन फिरून फिरून सांगतो ती मैत्रीण आहे माझी..


जरा आतीच झालं नाही,भाड मे जाय जमाना हे मैत्रीचं पावित्र्य जपत असच चालत राहू आम्ही..

कुठल्याही बंधनाची आणि तुमच्या त्या प्रेम नावाच्या लपड्याला भीत नाही आम्ही..

एकमेकांचा स्वाभिमान जपतो,नात टिकवण्यासाठी वचनाची लाच घेत नाहीत आम्ही..

नाय गैरसमज होयला नको म्हणुन सांगतो परत, तेचतेच,फिरुन फिरून ती मैत्रीण आहे माझी..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract