चला राख होवूया
चला राख होवूया
बिनधास्त, बेफिकर होऊन तो एका वेगळ्याच प्रवासाला निघालाय..
त्याला थांबवा कितीही, अडवा, शपता, घाला, लोटांगण घ्या नाहीतर नाक घासा...
त्याला नाही पडणार फरक आता कशाचाच आणि कुणाचाच..
त्याला नाही कळणार आता तुमची हळहळ,तडफड तो नाही म्हणजे नाहीच फिरणार आता परत..
तुमची नाती, तुमच प्रेम आणि तो विश्वास, जिव्हाळा कुत्र्याच्या शेपटा सारखाय, हे कळून चुकलय आता त्याला..
या जगण्याला, या खोटेपणाला आणि हो तुमच्या धर्माला, जातीला काडी लावून तो मोकळा झालाय आता..
अर्ध -निम्म आवासान गेल असेल आता त्याला समजावून आहे तेही गाळून टाक असवांच्या थेंबा सोबत..
तो पेटलाय आता, तो विसरून गेलाय तुला,याला आणि त्यालाही..
तो वितळून चाललाय मेनासारखा राख होण्यासाठी चला तो खुणावतोय आपल्याला.
चला आपणही बिनधास्त,बेफिकर,बेजवाबदार मुसाफिर
होवूया....
चला, चला उगीच जीवाचे हाल नको चला आपण सोबत राख होवू या.
