STORYMIRROR

Akash Bansode

Inspirational Others

3  

Akash Bansode

Inspirational Others

तुला वाचताना

तुला वाचताना

1 min
126


त्या नवीन पुस्तकाच्या करकरीत पानासारखी आहेस तू.........

गोंदलेले अक्षरे,वाहणारे शब्द,साचलेल्या ओळी अन त्यातून उमगलेला अर्थ तू.

माझा काना,मात्रा,आकार,उकार,वेलांटी,स्वल्पविराम, पूर्णविराम अन अवघ्या आयुष्याचा अलंकार तू..

मी चाळत राहतो तुझी पाने, अन समजुन घेतो मीच मला नव्याने..

तुझ्या मनाच्या ग्रँथांचा कोंदटलेला दर्प अत्तर होऊन मग दरवळत राहतो माझ्या रिकाम्या ग्रँथालयात.

तुझी शांत वाटणारी नजर किंचाळत राहते अन माझ्यातल पुरुषपन सुटत जात तुझ्या प्रत्येक पानाच्या स्पर्शासोबत..

मुखपृष्ठापासून शेवटाला येईपर्यंत झिजत राहत तुझ बाईपन अन मी उगाच थुका लावून पलटत राहितो तुला..

तुझ्या ओळीओळीतला गुदमरलेला विद्रोह झिरपत जातो मग माझ्या हडामासात..

तरीही तुला वाचताना माझा पुरुषार्थ लयास जाऊन मी केंव्हा बुद्ध होतो हे मलाच कळत नाही..

अशी तुझी कितीतरी पुस्तके गर्भात ग्रँथालयांच्या खाणी घेऊन फिरत राहतात माझ्या अवतीभवती..

अन तू बाटवतेस धर्म म्हणून तुझ्या कित्येक ग्रँथांचा गर्भपात करून टाकतो आम्ही अगदी तुक्याचा केलता तसा..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational