पाऊस
पाऊस
1 min
382
ना भिजली माती,ना गंध पसरला
ना फुलले काही, ना बहर आला
ना वाहिला वारा,ना शहारा आला
हा कसला वसंत,सारे करपवून गेला
हे काय झाले ,काय चमत्कार झाला
कोरडे आभाळ,कोरडा समुद्र झाला..
कवेत सूर्याला घेऊन का ओकतेस आग तू
तुझ्या आतला चंद्र का एवढा निष्ठुर झाला
ना थंडी गुलाबी,ना नजर शराबी
सांग सांग राणी काय घात झाला..
बरसायचीसन तू ही मनसोक्त त्याच्यासोबत
तुझ अन पावसाच आता जमत नाही बहूतेक।।
