STORYMIRROR

Ashutosh Purohit

Abstract

3  

Ashutosh Purohit

Abstract

* थेंबांचे टपाल !! *

* थेंबांचे टपाल !! *

1 min
28.3K


 

 कुठे पावसाळी सर, आणी आनंद लुटून !
 कुठे मोहर मातीचा जाई सुगंध देऊन !

 पानापानावर जन्मे एक मोती इवलासा !
 स्वच्छ अंघोळ सृष्टीला, घाली नभ सावळासा !!

 नदी, झरे, तलावही ओसंडती आनंदाने !
 कोकीळेला सूर मिळे, अवचित पावसाने !

 सृष्टीच्या या संसाराचे रूप देखणे कमाल !
 बावरल्या मना आले, जणू 'थेंबांचे टपाल' !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract