जपावी
जपावी
बोलावस वाटल कधी नक्कीच व्हाव व्यक्त
माणूस मात्र असावा अगदी जवळचा फक्त
दुखी असेल कोणी तर व्हाव पाठीवरची थाप
द्यावा एकमेकांना कधीतरी मदतीचा हात,
कधी व्हाव हळवी माय तर कधी व्हाव सांभाळून घेणारा बाप
अबोला असावा पण फक्त काही क्षणांचा,
नाती जपावी
भांडण संपून मिटवावा दुरावा मनांचा
रक्ताचे नाते जपून ठेवावे
जीव असता
नसता जन्मदाते कोणाला मायबाप म्हणता
हक्काचे असावे सारे हक्काने भांडणारे पाऊल पडता चुकीचे समजून सांगणारे
जपून ठेवावी माणस आपली असो वा परकी
भेदभाव नसावा कसला
असावी सर्व एक सारखी
प्रेम आपुलकी असावी नेहमी मनात त्याला सीमा नसावी
भावना इतकी गोड ती अखंड जपावी..
