घुसमट त्यांची
घुसमट त्यांची
सगळ्यांना सोबत घेऊन
शाळेच्या आठवणी जागवल्या...
एकमेका संपर्कात राहण्या
व्हॉटस्अप गृप केला...
रोज जून्या आठवणीत
रमले होते सर्व...
कोण कसे कुठे
होते त्यावेळी आपण...
आता आपण कसे
काकू बाई झालो...
काय कोणास ठाऊक
कशी घुसमट काहींची झाली...
दुसरा गृप तयार झाला
बडबड त्यांची दुसर्या गृपवर झाली...
दुसर्या गृपवर ही
कशी घुसमट त्यांची झाली...
मग काय तीसरा गृप झाला
बडबड त्यांची दुसर्या तापवले ही झाली...
मग परत तीन इंजिनचे सरकार करत
पहिल्याच गृपवर सर्व परत सामिल झाल्या!!!
