कर्म
कर्म
यशापयशाची चढाओढ उरी
एकास दुजा ठरतो भारी
कशास मीपण मिरवणे तरी
नियती बघते गंमत सारी
येणे जाणे इथे प्रत्येकाचे
बंधन येथे असे काळाचे
वागणे मनमानीने कोणाचे
फळ स्विकारावे स्वकर्माचे
मिळे कधी प्याला अमृताचा
कधी पचवावा घोट विषाचा
कधी गोड, कधी कडू घोट तो
विषाद धरशी कशा कशाचा
जाण अर्थ मनुजा जीवनाचा
का भार पेलसी व्यर्थ इच्छेचा
नको गुंतणे आता इतुके
कर्माने मिळतो पथ मोक्षाचा...
