STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

लगीन घाई झाली

लगीन घाई झाली

1 min
155

लगीन घाई झाली,

डोळ्यांत स्वप्न सजली,

सांभाळा या मनाला माझ्या ,

वधु मंडपी लाजली...

वर चालुनी आला ,

स्वप्नाचा राजकुमार ,

सत्यात उतरला ,

हूरहूर वाटते काळजाला ,

लग्न मुहूर्त काढला ...

मेंदीला चढला रंग ,

हळदीचं पिवळ अंग,

संगीताच्या सुरांनी ताल धरला,

अक्षता डोईवर पडल्या ...

लगीन घाई झाली , डोळ्यांत स्वप्न सजली,

सांभाळा या मनाला माझ्या , वधु मंडपी लाजली...

सुर सनई चौघडा वाजला,

नव्या स्वप्नांच्या वेलीवरती,

मोगरा सेजेवर सजला ,

सुगंध हृदयात दरवळला...

मोहरून रोमारोमांत शहारा उठला,

स्पर्श जणु मोरपिसारा फुलला,

कांती दुधाळ तोजोमय ,

वितळली काया मिठीत घेऊनी चंद्राला...

लगीन घाई झाली , डोळ्यांत स्वप्न सजली,

सांभाळा या मनाला माझ्या , वधु मंडपी लाजली...

एका लग्नाचा प्रवास ,

पुर्ण करी दोघाला ,

दूसरी गोष्ट संसारी ,

कल्पना आली वास्तवाला...

कर्तव्य मोठी जबाबदारी,

एकमेंकास सांभाळी ,

स्पंदनाला श्वास तुझा भरता,

माझ्या जीवनाला अर्थ आला ,

प्रेमाने हा संसार सजला ...

लगीन घाई झाली , डोळ्यांत स्वप्न सजली,

सांभाळा या मनाला माझ्या , वधु मंडपी लाजली...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract