माझ्या अंगणी चांदण फुललं
माझ्या अंगणी चांदण फुललं
रिमझीम धारांनी ,
मन शिवार झुललं,
थेंब टपोरं मातीस बिलगलं,
जणु सांडला सडा नक्षत्रांचा ,
माझ्या अंगणी चांदण फुललं ...
धुंद मातीस कुंद वास येता,
दरवळला सुगंध मन खुललं ,
मोहरून आलं पात पात,
दवास पिऊन रंगुन गेलं ,
माझ्या अंगणी चांदण फुललं ...
डोंगरमाथी सजता सुर्य,
लाल केशरी पिवळ पितांबर नेसलं,
संमोहित झालं नाजुक पाखरू,
आभाळाच्या प्रेमात पडलं...
माझ्या अंगणी चांदण फुललं ...
कोरून घेत रात्र नक्षी ,
धूसर चंद्र चांदण्यात नाहलं,
पाहाट होता भरून आलं,
दाटून येता पुन्हा बरसलं,
माझ्या अंगणी चांदण फुललं ...

