पावसाळा येतो
पावसाळा येतो
पावसाळा येतो...
का? कुणास ठाऊक रोज पावसाळा येतो,
डोळ्यात कधी उश्याशी पावसाळा येतो ...
ते आठवांचे थवे दूर उडुनी जातात ,
तो सांज काठी दाटून पावसाळा येतो ...
चांदण रात्र सताड उघडी डोळ्यात तुटे ,
चंद्र लपता ढगाआड पावसाळा येतो...
वाटले होते तेव्हा तु वळुन बघावे ,
सावल्यांचा लपंडाव पावसाळा येतो...
तु हसल्यावर यायचा तो अवेळी तेव्हा ,
मी रोज वाट बघता पावसाळा ।येतो ...
हरवता मी स्वप्नात तुझ्या विचलीत मन ग,
गर्दितही असहय ऐकटे पावसाळा येतो ...
