थांबा
थांबा
धडधड रेल्वेपटरीवर ऐकु आली ,
हृदय कुणाचे निसटून तार आली...
रंग उदासीचा चढला जेव्हा माथी,
या आडमार्गाची का? तुला याद आली...
होते निरभ्र आकाश सारे काही निळ,
आभाळ मनाचं दाटून बरसात आली...
थांबा पाहिला की? आता धडकी भरते,
तुझ्या प्रवासाची आठवण परतुन आली ...
भेटशील तु जेव्हा कधी त्या परमेश्वराला,
विचारशील जाब र्दुबूद्धी मला का? आली ...
