STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract

3  

Manisha Wandhare

Abstract

आई तुझ्या चरणी

आई तुझ्या चरणी

1 min
116

आई तुझ्या चरणी माथा टेकला ,

मंदिराच्या गाभाऱ्यात ,

श्रद्धेचा दिप उजळून ,

मंद मंद दिप पेटला ...

आई तुझी माया ममता पाझरी,

उंबरठा ओलांडून ,

थबकले पाय निघेना

मन जायेना घरी ...

आई तुझ्या रूपाची गं मोहिनी ,

पाहता तुला होते दंग,

मन माझे संमोहित ,

मी जाणार नाही दूरूनी ...

आई तुझे वास्तव्य गडावरी ,

संकटांना सामोरे जा,

घाबरू नकोस संघर्षाना ,

आश्वासन तुझे मी तुझ्यावर कृपा करी ...

आई तुझ्यात आहे आदिशक्ती ,

विकृतीचा संहार करी ,

जन्म घे पुन्हा पुन्हा इथे,

दाखवुन दे ओळख तुझी ही भक्ती...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract