गुलाबी रंग
गुलाबी रंग
लाल रंगाच्या कुचित साजेसा,
पांढरा रंग थोडा मिसळून
तयार होतो गुलाबी रंग,
घेतो साऱ्या नात्यांना जुळवून
लाल रंगात शक्ती अन् ताकत,
पांढऱ्या रंगात सुखसमृद्धी
मिश्रित तयार गुलाबी रंगाने झाली,
प्रेमळ नात्यांची शुद्धी
रंगाची सात रूपे,
सप्तरंगी इंद्रधनु आकाशी शोभती
गुलाबी भावनांचा रंग,
सकारात्मकतेचे प्रतीक बोलती
गुलाबी रंग असतो, जेथे,तेथे
प्रेम आनंदचा वर्षावं होतो
आनंदाचे सतत वातावरण,
अन् नात्यामध्ये प्रेम वाढवतो
