वेड प्रेमाचे
वेड प्रेमाचे
वेड प्रेमाचे
वेड प्रेमाचे लागतात सहज
विश्वासाची असते त्यात गरज
वेड प्रेमाचे अधीर करी मनास
ओढ लावून छेडे क्षणो क्षणात
वेड प्रेमाचे दावे मार्ग नवा
आपुलकी नात्यात गोडवा हवा
वेड प्रेमाचे अंतरी दडलेले
सुखकर जगणे सत्य कळलेले
वेड प्रेमाचे मोर पंखाचा पिसारा
सप्तरंगी प्रीतीचा प्रेमळ नजारा
वेड प्रेमाचे त्यात स्वार्थ नसावा
श्वासाला दयावा हक्काचा विसावा

