बहर
बहर
चांदण्याचा बहर बंद डोळ्यांनी टिपतांना
आठवणीचा तुटलेला बंध घट्ट धरतांना
कितीतरी शब्दांचे घाव हसतं झेलतांना
नात्यांची वीण प्रेमाच्या धाग्यात विनतांना
एकोपा जिव्हाळा सारं समर्पित करतांना
कोणता छंद आवड विरंगुळा म्हणतांना
न दिलेला मान आदर सर्व काही करतांना
कशी करावी थोरवी आपले सारे असतांना
प्राजक्ताचा सडा हृदयी प्रीत फुलवितांना
काळोखी रात्र बंद डोळ्यात साठवतांना
आयुष्य किती देखणं प्रत्येक क्षण स्मरतांना
पाऊस सरीत प्रेमाची हिरवळ अनुभवतांना
