जास्वंद
जास्वंद
जास्वंद कसा फुलला
बघा फांदीवर झुलला
भडक लालबुंद रंग
बघताच नजरेत भरला
जास्वंद कसा फुलला
अंगण बागेत बहरला
दिसता फांदीवर फुल
तोडण्यास हात वळला
जास्वंद कसा फुलला
कोमजून खाली पडला
सकाळी टवटवीत सौंदर्य
सायंकाळ निस्तेज ठरला
जास्वंद कसा फुलला
जगण्याचा मर्म दडला
काहीही कायमचे नाही
निसर्गाचा नियम कळला
जास्वंद कसा फुलला
आयुर्वेदिक गुण भरला
मातीशी होण्या एकरूप
जास्वंद बघा तळमळला
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला
