खट्याळ पाऊस
खट्याळ पाऊस
कविता : खट्याळ पाऊस
असा कसा हा पाऊस
अधून मधून येतो
न सांगताच गं बाई
येऊन मज भिजवतो
चोळी होते मग ओली
साडी माझी भिजते
धो धो बरसतो पाऊस
जेव्हा घरातून मी निघते
आडोशाला झाले उभे
तास भर पासुन बाई
विचार केला मनातच
पाऊस का थांबत नाहीं
शेजारीण आली जवळ
म्हणे पाऊस हाय खोटा
भरवशावर बसायचं नाहीं
आपला होतो मग तोटा
कास्तकार विनवणी करतो
तेव्हा पाऊस पडत नाहीं
अकाली रूप धारण करून
पिकाची करतो हानी...
खट्याळ पावसाची आहे
सुख दुःखाची कहाणी
निसर्गाचे करा म्हणे संगोपन
जिवीत हानी होणार नाहीं
©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला

