आत्मविश्वास
आली कितीही संकटे
मार्ग मात्र सोडायचा नाही
प्रयत्न सुरु ठेऊन
जे पाहिजे मिळेल सर्व काही
आळस कंटाळा नको
सतत कार्य कुशल रहावं
आवडणार सारं करावं
जे हवं ते सारं मिळवावं
ओंजळ रिकामी जरी
मग हतबल कशाला व्हावं
यशाची दरी खोल जरी
मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करावं
प्रयत्नांना दोनच बाजू
यश किंवा अपयश
सारं निर्भर प्रयत्नांवर आपल्या
मग करू नये कसला प्रश्न
अंतरी जागृत राहो
आत्मविश्वास मोठ्या मनाचा
खचल्या मनाने राहू नये
आनंद घ्यावा आयुष्याच्या क्षणाचा
©® चैताली वरघट