STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Inspirational

4  

Chaitali Warghat

Abstract Inspirational

जय भीम शब्द घेता

जय भीम शब्द घेता

1 min
376

जय भीम शब्द घेता 

स्वाभिमान जागा होतो 

दलित शोषित पीडितांना 

जगण्याचा हक्क देतो 

जय भीम शब्द घेता 

क्रांतीचा प्रतीक ठरतो 

धार्मिक शब्द नसून 

धर्माला मानत नसतो 

जय भीम शब्द घेता 

आपुलकीचा भाव उमटतो 

जनसमुदाय आदराने 

जय भीमचा नारा देतो 

जय भीम शब्द घेता 

सत्याचा मार्ग कळतो 

लढण्यास मिळते बळ 

शब्द प्रेरणादायी ठरतो 

जय भीम शब्द घेता 

जगण्याचा अर्थ उमगतो 

स्वातंत्र्य समता बंधुता 

दया क्षमा शांतीचा संदेश देतो 

©® चैताली वरघट 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract