मंकीपॉक्स विषाणू
मंकीपॉक्स विषाणू
मंकीपॉक्स रुग्णांची संख्या
धुमाकूळ घालत आहे जगभर
संशयित रुग्णांची नोंद झाली
आपल्या ही भारत भूमीवर
मंकीपॉक्सचे आगमन झाले
म्हणतात आपल्या महाराष्ट्रात
पालेभाज्या जेवणात घ्याव्यात
दूध फळे घ्यावी रोज नाश्त्यात
आरोग्य मंत्रालय देते माहिती
रुग्ण विलगीकरणात ठेवले
आफ्रिकन देशाने जागतिक
स्वास्थ आणीबाणी घोषित केले
धुमाकूळ घालत असलेला
साथीचा रोग खूप भयंकर
तातडीने उपाययोजना करणे
रुग्णांच्या संख्येत पडू नये भर
मंकीपॉक्स घातक विषाणू
करावे जोखीम व्यवस्थापन
ठोस उपाययोजना कराव्या
मंत्रालयाचे आहे असे निवेदन
विषाणू युक्त दूषित खाद्य
खाल्ल्याने रोग पसरतो
रोगाचे पुरेसे ज्ञान नसता
मग मृत्यूचा धोका संभवतो
