कविता : श्रावण धारा
कविता : श्रावण धारा
श्रावणाची चाहूल झाली
आला सण उत्सव मेळा
माळरानात बांध्यावरती
रानभाज्यांचा मोठा वेढा
श्रावणाचे साजिरे रे रूप
बघता होई मन आनंदित
हिरवेगार गवताचे पाते
जणू बसले हिरव्या वर्दीत
तांबूस पिवळ्या किरणातून
ऊन पावसाचा चाले खेळ
क्षणात शांत कधी धो- धो
जसे पावसाला लागले वेड
रिमझिम रिमझिम छान वाटे
अवचित पडणारी सर
वृक्षवल्ली मनमोहक दिसती
इद्रधनुची असे त्यावर भर
थुई थुई करी मयूर रानात
गुलाब हसतो फांदयावर
रानपाखरे मुक्त विहारी
दिसें रानफुलांना आलेला बहर
कधी दाटते मेघ अंबरी
कधी उन्हाची येई किरण
व्याकुळ मनास आंनदीत करी
श्रावणातील प्रत्येक सण
टपोरे शुभ्र दवबिंदू शोभे
पान, फुल, गवत, पातीवर
शेतकरांच्या कष्टाचे मोती
पीक डोलते काळ्या मातीवर
