तुझी ओढ
तुझी ओढ
तुझी ओढ...
ओढ तुझी स्पंदनाला ,
दीप जसा मंद झाला ...
रात अशी बहराला,
चंद्र जसा धुंद झाला ...
वाट तुझी हीरमुसे ,
पायदळी रुंद झाला ...
अंतरंगी श्वास आला ,
आरशाशी द्वंद झाला ...
प्रेम जागुनी मनाशी,
जीवनाचा छंद झाला ...
तू अजूनही उरलेला,
सांज काठी अंद झाला...

