STORYMIRROR

Raakesh More

Horror Tragedy Others

3  

Raakesh More

Horror Tragedy Others

कब्रस्तान

कब्रस्तान

1 min
116

आज माझी गाडी 

कब्रस्तान जवळ बिघडली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 0 ||


डिक्कीतून गाडीचं 

सामान काढलं 

जॅक साठी डिक्कीत 

लक्ष गाढलं 

तेवढ्यात डोक्यावर 

थाप एक पडली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 1 ||


दचकून मी 

मागे पाहिलं 

भीतीचं सत्र 

मी तिथे साहिलं 

तेवढ्यात आकाशात 

वीज कडकडली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 2 ||


पावसाची चिन्ह 

दिसत होती 

सूर्याची लाईट 

विझत होती 

हृदयाची माझी 

गती धडधडली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 3 ||


इंजिन मध्ये दोष 

शोधू लागलो 

असा कसा मी 

वेड्यासारखं वागलो 

कारची चावीही 

चिखलात मढली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 4 ||


वातावरण का 

भयग्रस्त होतं 

विचार करणं ही 

त्रस्त होतं 

माझ्या मेंदूत 

भीती चढली 

कार मधून उतरून 

मी डिक्की उघडली || 5 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Horror