छळ...
छळ...
छळ
हुंड्यासाठी छळले जाते
नित्य मला सासरी
सांगावा उपाय यावर
मला कोणी तरी.
सासू ,नंदा,दिर, भाया
कसली च कुणाला नाही माया
राबवती मला च सारे
नित्य मोलकरणी परी...
भांडण लावी सासू बाई
नवरा रोज मुसळ घेई
नंदा जावा करती कुटाळकी
कोणी मला न तारी...
साऱ्यांचेच टोचून बोलणे
होऊन बसते कठीण जगणे
हानून मारुन रोज काढती
मज उगीच रस्त्यावरी...
सहज बोलती नको नांदणे
रहा बापाच्या घरी,
ये घेऊन जे मागू ते
नाही तर घटस्फोटास तयारी...
ठेवले जाते कधी उपाशी
कधी खायला कुटके शिळे,
केले कित्येक जाळण्याचे प्रयत्न
रॉकेल टाकून अंगावरी...
सोसतात कित्येक जणी
निमुटपणे हा छळ
माझी ही तीच वेळ
चालणार हे कुठवरी ...
कित्येक होतात घटस्फोट
हुंडाबळी कितीतरी,
तरी नाही या न्याय जगी
किती दुर्दैवी नारी.
....
गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड

