STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Drama Horror Crime

माकडं

माकडं

1 min
11

इकडचे तिकडं
 तिकडचे इकडं
 सांगा का पाहू
 पळतात माकडं...

 धंदा झाला यांचा
खरात घुसला घरात,
बापच माहीत नाही
 यांचं कोण करणार वाकडं...

 जिरत नाही यांची
 कोण्या एका ठिकाणी,
सवय दहा जागची
 कुणाही घालतात साकडं...

 विकले जातात
 विकतही घेतात,
अंधार करून ठेवला
 दिवसाचं यांचं लफडं...

 कुणाचही घेतात तोंडात
 कधीही कोणतं नाव,
हरामांना ठोका पाडा
रचा यांची लाकडं...

 कितीजण हवेत यांना
 किती ला दिला धोका,
 देऊन हजार लाथा
वाजवा यांचं डफडं...

 रस्त्यावरचे हे छिनाल
 जमत नाही घरात,
काढावी किती वरात
 फाडून यांची कापडं...

 गायकवाड रवींद्र दापकेकर नांदेड


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama