आयुष्याला टोचले काटे
आयुष्याला टोचले काटे
आयुष्याला टोचले काटे पोटाला ना मिळे भाकरी,
अनवाणी पायाने फिरलो घाम गाळूनी केली चाकरी..//
आयुष्याला टोचले काटे संकटाला गेलो कसून,
सावकाराने घातली व्यसन गावभरं फिरविले काळा फासूनी..//
आयुष्याला टोचले काटे भुकेच्या वेदणेने जीव होई घामाघूम,
लेकरांच्या वेदना पाहूनी बापाचं मन होई सामसूम..//
आयुष्याला टोचले काटे अश्रूंची कधी होतील फुले,
दगडाला फुटेल का पाझर सुखी होतील का माझी मुले..//
आयुष्याला टोचले काटेपोटाला पडले टीचरे,
भिकेचे लागले डोहाळे यमाला आली दया स्वर्गात नेले सुखाने..//