Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yogesh Borhade

Romance

3  

Yogesh Borhade

Romance

सहजपणे या वळणावर

सहजपणे या वळणावर

1 min
79

सहजपणे भेटली या वळणावर

आठवण ठेवुनी गेली मनावर,

हृदयाचे स्पर्श जाणवले

माझ्या ओठावर..||

सहजपणे भेटणे तुझे

नवल माझ्या प्रेमासाठी,

जाणवले नाही माझ्या हृदयाला

तुझ्या ओठावरचे गुलाबी पाणी..||

सहजपणे भेटली नदी

किनारी हातात हात घेऊनी,

समुद्राचे शिंपले मोजले मी सारे

त्यातले मोती दिसू लागले डोळ्यावर..||

सहजपणे भेटली या वळणावर ती

नाही विचार केला मी कधी,

होशील तू माझी राणी

स्वप्न मी पाहिले तुझ्यात सारे..||

सहजपणे या वळणावरची

गोष्ट होऊन गेली प्रेमाची,

कधी ना पाहिलेले स्वप्न

झाले पूर्ण सहजपणे या वळणावर..||

Rate this content
Log in