STORYMIRROR

Kirti Borkar

Drama

3  

Kirti Borkar

Drama

भावाची बहीण लाडकी

भावाची बहीण लाडकी

1 min
102

भावाची ही बहीण लाडकी

नाही कुणी तिच्या सारखी

भावावर तिचा खूप जीव

सुख दुःखाची ती पारखी.....


भावासाठी बहीण धावते

नेहमी त्याला ती साथ देते

रागावली तरी हळूच येऊन

पाठीवरून हात फिरवते


भावाची ही बहीण बनते

त्याला आईची माया देते

तिच्यासारखं कुठे नातं

सगळी नाती धरून चालते...


डोळ्यात कधी भावाच्या

येऊ देत नाही पाणी

हसत खेळत रोज त्याला

सांगत असते नवी कहाणी


भावासाठी बहीण खास

मिळो न मिळो कुणाची आस

तीच माझी बहीण लाडकी

तीच माझ्यासाठी आहे खास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama