गीत तुझ्या प्रेमाचे
गीत तुझ्या प्रेमाचे
गीत प्रेमाचे तुझ्या
गात मी असते
कुठे काय आहे याचे
कधीच भान नसते
चालत असते होऊन
प्रेमात अशी बेधुंद
तुझ्या प्रेमगीताचा
लागला मज हा छंद
सुर ताल ऐकून तुझ्या
गाण्यात अशी गुंगते
वेड्या मनास माझ्या
थांब जरा मी सांगते
जादू अशी गाण्यात
हळूच लाली चढते
तुझ्याचसाठी जीव
खूप खूप धडपडते