विश्वास
विश्वास


नात्यात तुझ्या माझ्या
विश्वास आहे बाळा
सोसल्या जात नाही
दुराव्याच्या या कळा
तुझ्या प्रेमात मला
लावत का नाही लळा
खूप दिवसापासून रे
फुलला नाही रे मळा
वाटे तुझ्याजवळ येऊन
रडतांना पकडावं गळा
दुराव्यातही माझ्यात
पडू दे प्रेमाचा तू सळा
प्रेमात तुझ्या रे रोज
पावसाच्या पडती झळा
आठवणीत तुझ्या रे
वाटे तुझ्याकडे वळा