आयुष्याचा भागीदार
आयुष्याचा भागीदार


विचारांसोबत त्यांच्या
माझी वळली पावले
योग्य निर्णय घेतांना
भावनांना आज कळले
भविष्याची ओढ अशी
स्वप्न त्यांचेच साहसी
झोका घेत आकाशाशी
वाटे रोजच धाडशी
स्थेर्य अचूक असते
तीक्ष्ण विचारांचे बाण
घेते सोसून बुद्धीला
आयुष्याचा खूप ताण
खळखळ हास्य त्यांचे
हाच मोठा शृंगार
दिसे डोळ्यात तेजस्वी
आयुष्याचा भागीदार