हिरवा चुडा
हिरवा चुडा


आई मी गं आता
झाली खूप मोठी
हाती हिरवा चुडा
भर गं माझी ओटी
लागतील डोहाळे
सातव्या गं महिन्यात
येईल माझं बाळ
हर्ष होतो काळजात
माझ्या गाभाऱ्यात
नव जीव जन्मलं
आई लेकाचं नातं
आज जवळून कळलं
आनंदाचा उत्साह
पार केला सोहळा
किलकारी देत आहे
आपल्या घरी बाळा