तुझे फेडू कसे उपकार
तुझे फेडू कसे उपकार
प्रेमासाठी या माझ्या उघडले मनाचे दार
सांग ना सख्या तुझे फेडू कसे उपकार...!!ध्रु!!
दुःखात दिली तू प्रेमाने मला साथ
जागून काढली माझ्यासाठी ती रात
प्रेमात तुझ्या मिळाले जगण्याचे संस्कार...||१||
साथ देत राहशील नेहमीच तू असा
विश्वास केला तुझ्या प्रेमावर मी जसा
येता तुझ्या जवळ केला प्रेमाला नमस्कार...||२||
क्षणाक्षणात तू रोज प्रेमाची नाती जपली
तुझ्यामुळे मला खऱ्या प्रेमाची रीत कळली
माझ्या प्रेमासाठी तू केला असा चमत्कार...||३||