STORYMIRROR

Nayana Gurav

Drama

3  

Nayana Gurav

Drama

पाऊस

पाऊस

1 min
114

नभ ही दाटून आले, दाही दिशा अंधारली

गडगड गडगड ढगातून, कडाडत एक वीज गेली.

पशुपक्षीही सैरावैरा पाखरे घाबरी पिलांपाशी

टिवटीव टिवटीव टिटवीची नभामधुनी घुमत जाशी

जनावरे गोळा गोठ्यात गाय आपले वासरू चाटे 

आभाळ येता उताराकडे कृषीराजाची लगबग दाटे 

चारापाणी जळणकाडी ठेवी सारं झाकून सवरुन 

सालभरचा जिन्नस सारा जपून ठेवी निगुतीन आवरून 

कोळपणी टोकणी नांगरणी झोकात केली पेरणी

पावसाचे थेंब पडताच आनंदाने गातो गाणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama