वीर जवान
वीर जवान


मातृभुमीच्या रक्षणासाठी
वीर जवान तो चालू लागे
निरोप देता मातेच्या
नयनी नीर वाहू लागे.
उगीच नको ढाळू अश्रू
जिजाऊ सम तू शूर आई
सळसळते रक्त माझे
कर्तव्याची झाली घाई.
भाग्यवान तू असे खरोखर
पूस तुझे डोळे आई
पुत्र तुझा मी वीर खरा
आज देशाच्या कामी येई.
तुझ्या परी ती ही मायभू
ऋण तिचेही मला फेडू दे
होऊ दे उतराई अन
तिरंग्याच्या रंगात रंगू दे.
निडर मी शूर वीर
नको घाबरु तू आई
विजय पताका घेऊन येईन
जिंकून साऱ्या दिशा दाही.